Sorry! JavaScript is disabled in your browser. To get the best user experience on our website you should enable it.

Tuljabhavani Live Darshan

2 years ago

ID: #823591

Listed In : Hostels

Business Description

तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या शक्तिसामर्थाच्या कथा सर्वांना माहित आहेतच.
अगदी पौराणिक काळापासून मातेचे महात्म्य कथन करणा-या कथा समस्त भक्तांना स्फुर्ती देउन जात असतात. मातेचे भक्त नेहमीच तिची आराधना मोठया भक्तिभावाने करतात आणि त्यांना तिच्या सामर्थ्याची प्रचिती पावलोपावली येत असते. पण तुळजापूरच्या तुळजाभवानीचा भक्तसंप्रदाय हा फक्त महाराष्ट्रा पूरता मर्यादित नक्कीच नाही. समस्त भारतात तुळजाभवानीच्या वेगवेगळया स्वरूपांची आराधना वेगवेगळया प्रकारे करण्यात येत असते. पण मातेच्या भक्तांबाबत आश्चर्य चकित करणारी एक कथा नेपाळच्या राजाच्या संधर्भात पण आहे. मग नेपाळच्या राजालाही तारणा-या भवानी मातेची ही कथा ही प्रत्येक भवानी भक्तानी जरूर जाणून घ्यावी अशीच आहे.
सर्व भक्तांना हे सांगायला आनंद होतो कि माता तुळजा भवानी ही नेपाळच्या राजाची पण आराध्य देवता आहे. मातेला नेपाळ मध्ये ‘देवू तलेजू भवानी’ या नावाने संबोधित केले जाते. नेपाळच्या भक्तपूर, काठमांडू आणि पाटण या तीन महत्वाच्या शहरांमध्ये देवीची मंदिरे आहेत आणि तिची मोठया भक्ती भावाने पूजा अर्चा होत असते.
मग तुळजा भवानी नेपाळच्या राजाची आराध्य देवता कशी बनली असेल? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
तर ज्यावेळी बिहारच्या चंपारण्याचा राजा हरीसिंह हा दिल्लीच्या सुलतान तुबलक याच्या बरोबरच्या लढाईत हरला तेव्हा राज्य सोडून नेपाळला पळून गेला. पण जाताना त्याने देवघरातील सर्व देव बरोबर घेतले होते. त्या देवांमध्ये माता तूळजाभवानीची मूर्तीपण होती. नेपाळमध्ये गेल्यावरही त्याचा परिवार सर्व देवांची मनेाभावे पूजा अर्चा करत असे. मग जणू देवीची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याच्या मुलाचा विवाह नेपाळच्या राजकन्येशी झाला. त्यावेळी नेपाळचा राजा रूद्रमलय याने हरीसिंह याच्या परिवाराला राजघराण्यात समावून घेण्याचा सन्मान दिला आणि मातेच्या कृपेमूळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे हरीसिंह याच्या लक्षात आले. त्यामुळेच त्याच्या वंशजानीपण तुळजाभवानीची आराधना करण्याचे व्रत घेतले आणि पुढे जेव्हा नेपाळचा विस्तार झाला तेव्हा तुळजाभवानीची तीन महत्वाच्या शहरांमध्ये मातेची मंदिरे बांधण्यात आली. अशाप्रकारे माता तुळजाभवानी ही नेपाळच्या राजाची आराध्य देवता बनली.










No Review.

Please login / register to add your review.