Sorry! JavaScript is disabled in your browser. To get the best user experience on our website you should enable it.

I Love Beed

2 years ago

ID: #795587

Listed In : Advertising

Business Description

➤ अचूक बातम्या, घटनेमागची सत्यता, निर्भीड आणि रोखठोक भूमिका हि त्रिसूत्री घेऊन तुमच्यासाठी "ILoveBeed.com" च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेत एक आधुनिक पाउल म्हणून वेबसाईट,अँड्रॉईड अप्लिकेशन फेसबुक,व्हाट्सएप ग्रुप, ट्विटर, आणि मेसेज च्या द्वारे लोकांना बातम्या, ज्ञान, मनोरंजन, माहिती पुरविण्या बरोबरच वर्षातील ३६५ दिवस राज्यासह देशभरातील सर्व ताज्या घडामोडी आमच्या वाचकाना थेट मोबाईलवर वाचायला मिळणार आहेत. ➤ गरज एका आधुनिक बदलाची वेगवान आयुष्यामध्ये निवांतपणे वृतपत्र वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्याएवढा कोणाला वेळ नाही घडणाऱ्या बातमीचे अपडेटस् क्षणाक्षणाला आमच्या वाचकाला तो जिथे असेल तिथे, तो जे काम करीत असेल त्यात फारसा व्यत्यय न आणता आम्ही ह्या वेबसाईट च्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ➤ आजच्या गतिमान काळात स्वतःला अपडेट ठेवणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे.त्यामुळे आपल्या अवतीभवती जगात काय घडते आहे याची नोंद जो ठेवणार नाही तो स्पर्धेच्या या युगात दूर फेकला जाईल. ➤सिटिझन जर्नलिझम: सिटिझन जर्नलिझमचे महत्त्व आजच्या काळात निर्विवादित आहे. युक्रेनमधल्या रशियाच्या आक्रमणाच्या कथा, गाझामधल्या हमासची इस्रायलने उडवून दिलेली त्रेधा, इराकमध्ये कुर्दिस्तानात आयएसआयएसने घातलेले वंशविच्छेदाचे थैमान हे कोणत्याही वृत्तसंस्थेचा वार्ताहर हजर नसला, तरी जगाला कळू शकले हे सोशल मीडियाचे योगदान आहे. एक जागतिक सर्वेक्षण सांगते कि सोशल मीडियावर पंचावन्न टक्के लोक आपल्याला कळलेल्या बातम्या शेअर करतात आणि ४६ टक्के लोक त्यावर चर्चा करतात . हीच स्थिती आपल्या देशामध्ये सुद्धा आहे. ➤ आमच्या प्रिय वाचक मित्रांनो, "I Love Beed" आपणा सर्वासाठी हक्काचे व्यासपीठ आहे कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न बाळगता या न्यूज पोर्टलवर तुम्ही तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, तुमचे लेख ,फोटो ,व्हिडीओ, सामाजिक उपक्रम तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची फक्त माहिती आम्हाला कळवा. अन्यायाला वाचा फोडणे हेच आपले काम आहे. आपण मिळून ते नक्की करूयात ,अट फक्त एकच आहे वार्तांकन करायचे ते पूर्णतः निष्पक्ष,निर्भीड,आणि सत्य परिस्थितीला धरूनच करायचे आहे. तुमच्या बातम्या आणि लिखाणाला "जनसाथी" वर ठळक प्रसिद्धी मिळेल याची खात्री बाळगा.. ➤ टू इन्फॉर्म, टू एज्युकेट अँड टू एंटरटेन ही पत्रकारितेची त्रिसूत्री मानली जाते. वैचारिक लेखन आणि समाजातील विविध प्रश्नांवर आग्रही भूमिका घेण्याबरोबरच आजूबाजूला घडते, ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो अशा गोष्टीं, शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, अडचणी, त्याला आवश्यक त्या गरजा त्याच्या समस्या माध्यमातून जगापुढे याव्यात, राजकारण्यांपर्यंत पोहोचाव्यात, आणि त्यावर उपाय योजना व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि आपण सर्व मिळून त्यासाठी प्रयत्नशील राहुयात.. वाचकहो आम्हाला तुयमच्या प्रतिसादाची व सहकार्याची आवश्यकता आहे. "I Love Beed"

Business Hours

Monday : 09:00 - 17:00

Tuesday - Closed

Wednesday - Closed

Thursday - Closed

Friday - Closed

Saturday - Closed

Sunday - Closed

No Review.

Please login / register to add your review.

Tags : news AD